कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते उद्या दिल्लीला

कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते उद्या दिल्लीला

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असणार्‍या कुरघोड्यांची गंभीर दखल पक्षाच्या हायकंमाडने घेतली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, यांच्यासह 19 जणांना दिल्लीला पाचारण केले आहे. 2 ऑगस्ट रोजी ही बैठक होईल.

मागील काही दिवसांपासून पक्षाच्या आमदारांनी मंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत वेगवेगळे आरोप केले आहेत. मंत्री आमदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना विश्वासात घेत नाहीत, निधीसाठी मध्यस्थांची आवश्यकता भासते, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागील आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे गांभीर्याने पाहत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह काही मंत्र्यांना दिल्लीला पाचारण केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री डॉ. जी. परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, रामलिंग रेड्डी, एच. के. पाटील, ईश्वर खंड्रे, के. एच. मुनियप्पा, दिनेश गुंडुराव, कृष्ण ब्यायरेगौडा, जमीर अहमद, शिवानंद पाटील, मधु बंगारप्पा यांचा यामध्ये समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news