Goa News : मोबाईलवर नको, मैदानावर खेळा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa News : मोबाईलवर नको, मैदानावर खेळा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

पणजी;  पुढारी वृत्तसेवा : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'फिट इंडिया चळवळ' प्रत्यक्षात आणायची असेल, तर 'मोबाईलवर नको, मैदानावर खेळा', असा संदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेमधील बॅडमिंटन स्पर्धेचे सकाळी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 रोजी होणार आहे.

डॉ. सावंत म्हणाले, गेली दहा वर्षे गोव्याची जनता ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण आज आला. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील पहिल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करताना मला खूप आनंद झाला. सकाळपासून शाळेतील मुले खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. संपूर्ण राज्यात खेळाचेच वातावरण आहे. ते 9 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. आम्ही बॅडमिंटन खेळलो, खूप छान वाटले, असेही ते म्हणाले. आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार कृष्णा दाजी साळकर, क्रीडा सचिव स्वेतिका साचन, अमिताभ शर्मा, डॉ. गीता नागवेकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news