छतीसगडमध्‍ये चकमकीत दोन नक्षलींचा खात्‍मा, स्‍फोटात दोन जवान जखमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील विजापूर जिल्‍ह्यात नक्षलग्रस्त पेडिया जंगलात झालेल्‍या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. पोलीस विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर आणि दंतेवाडा या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्‍यान, नक्षलविरोधी अभियानात जात असताना बस्तर फायटरचे दोन जवान स्‍फोटात जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर जखमी जवानांना हेलिकॉप्टरने रायपूरला उत्तम उपचारासाठी पाठवण्यात आले.

नक्षलग्रस्त पेडिया जंगलात झालेल्‍या चकमकीत डीआरजी, बस्तर फायटर्स आणि कोब्राचे जवान सहभागी आहेत. बिजापूरचे एसपी डॉ जितेंद्र यादव यांनी सांगितले की, पीडियाच्या जंगलात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news