Chhattisgarh News : सुकमामध्ये २१ वर्षांनंतर उघडले राम मंदिर; नक्षलवाद्यांनी लावले होते कुलूप

Sukma Ram temple
Sukma Ram temple

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरळपेंडा या नक्षलग्रस्त गावात १९७० मध्ये भव्य राम मंदिर बांधण्यात आले होते. मात्र, २००३ मध्ये नक्षलवाद्यांच्या इशाऱ्यामुळे मंदिर बंद करण्यात आले होते. आता सीआरपीएफच्या जवानांनी पुन्हा मंदिराची स्वच्छता करून त्याचे दरवाजे उघडले आहेत. Chhattisgarh News

सुमारे पाच दशकांपूर्वी केरळपेंडातील एका मंदिरात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी मूर्ती बसवण्यात आल्या होत्या. मात्र, हळूहळू नक्षलवादाच्या वाढत्या उद्रेकामुळे 2003 मध्ये मंदिरातील पूजा बंद करण्यात आली. यानंतर दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले.
1970 मध्ये बिहारी महाराजांनी मंदिराची स्थापना केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुकमापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर गावकऱ्यांनी डोक्यावरून सिमेंट, दगड, खडी आणि बांधकाम साहित्य पोहोचवले. मंदिर पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण परिसर श्रीराम भक्तमय बनला होता. या परिसरात मांसाहार आणि मद्यपानावरही बंदी घालण्यात आली. Chhattisgarh News

आजही गावातील ९५ टक्के लोक मांसाहार आणि दारू पिणे टाळतात. गावकऱ्यांनी सांगितले की, एकेकाळी येथे मोठी यात्रा भरत असे. अयोध्येतून ऋषी-मुनी येत असत. नक्षल प्रकोप वाढल्याने आणि नक्षलवाद्यांकडून पूजा-सेवा बंद पडल्याने जत्रेसह सर्व कार्यक्रम पूर्णपणे बंद झाले आहे. नक्षलवाद्यांनी मंदिराची विटंबना करून कुलूप लावले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news