Chhattisgarh News: छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षक ठार

Chhattisgarh News: छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. आज रविवारी (दि.१७) सकाळी झालेल्या या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) उपनिरीक्षक ठार झाले. तर एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. (Chhattisgarh News)

सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनचे एक पथक आज (दि.१७) सकाळी नक्षलविरोधी मोहिमेवर निघाले होते. दरम्यान छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, असे देखील पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Chhattisgarh News)

Chhattisgarh News: परिसरात CRPF, कोब्रा आणि जिल्हा दलाकडून शोधमोहिम

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात आज सकाळी (दि.१७) ७ वाजेच्या दरम्यान ही चकमक सुरू झाली. या चकमकीत CRPF 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हे ठार झाले तर पोलीस कॉन्स्टेबल रामू जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कॉन्स्टेबलवर  प्राथमिक उपचार करण्यात येत असून, त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने हलवण्यात आले आहे. या चकमकी संदर्भात चार नक्षलवादी संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर आजूबाजूच्या परिसरात सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाकडून शोधमोहिम राबवली जात आहे, अशी माहिती सुकमा जिल्हा पोलिसांनी दिली आहे, असे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Chhattisgarh News)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news