CSKvsKKR : केकेआरचे सीएसकेला 138 धावांचे आव्हान

CSKvsKKR : केकेआरचे सीएसकेला 138 धावांचे आव्हान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 137 धावांवर रोखले. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 32 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 34 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय सुनील नरेनने 20 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या, तर त्याने अंगकृष रघुवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. रघुवंशीने 18 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावांचे योगदान दिले. केकेआरसाठी नरेन आणि रघुवंशी यांच्यात केवळ अर्धशतकी भागीदारी झाली आणि ही भागीदारी तुटल्यानंतर केकेआरची फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि शेवटपर्यंत पुनरागमन करू शकले नाही.

श्रेयस अय्यर बाद

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून मुस्तफिझूर रहमानने सीएसकेला आठवे यश मिळवून दिले.

सीएसकेला सातवे यश

वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने चमकदार कामगिरी सुरू ठेवत सीएसकेला सातवे यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आंद्रे रसेल बाद झाला आणि 10 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरने अनुकुल रॉयला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवले आहे.

केकेआरच्या 100 धावा पूर्ण

कोलकाता नाईट रायडर्सने CSK विरुद्ध 100 धावा पूर्ण केल्या आहेत. 16 षटक संपल्यानंतर केकेआरची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 109 धावा होती.

रमणदीप बाद

रमणदीपच्या रूपाने केकेआरने पाचवी विकेटही गमावली. सीएसकेच्या महेश तिक्षानाने रमणदीपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रमणदीप 12 चेंडूत 13 धावा करून बाद झाला.

व्यंकटेश अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला

जडेजाने केकेआरचा डाव उद्ध्वस्त केला. त्याने व्यंकटेश अय्यरला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. व्यंकटेश आठ चेंडूत तीन धावा करून बाद झाला. केकेआरने अवघ्या 64 धावांवर चार विकेट गमावल्या.

कोलकत्ताला सलग दोन धक्के

रविंद्र जाडेजाने सातव्या षटकात दोन बळी घेत केकेआरला जबर धक्का दिला. त्याने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अंगकृष्ण रघुवंशी आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि पायचित बाद केले. रघुवंशीने 18 चेंडूत 24 धावा केल्या. तर पाचव्या चेंडूवर सुनिल नरेनला झेलबाद केले. नरेनने 20 चेंडूत 27 धावा केल्या. त्याच्या या खेळीत दोन षटकार आणि चार चौकारांचा समावेश राहिला.

केकेआरला दुसरा धक्का

अंगकृष्ण रघुवंशीच्या रुपात केकेआरला दुसरा धक्का बसला. त्याला रविंद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि पायचित बाद केले. रघुवंशीने 18 चेंडूत 24 धावा केल्या.

नरेन-रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सांभाळला

पहिल्या चेंडूवर फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर सुनील नरेन आणि अंगकृष रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सांभाळला. दोघांनी देशपांडे आणि शार्दुल ठाकूर यांची गोलंदाजी फोडून काढली.

पहिल्या चेंडूवर फिल सॉल्ट बाद

कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टच्या रूपाने धक्का बसला. केकेआरच्या सलामीवीर सॉल्टला तुषार देशपांडेने खाते न उघडता तंबूत धाडले.

चेन्नई संघात दोन बदल करण्यात आलेले आहेत. दिपक चहर, शिवम दुबे यांना बाहेर बसवले आहे. त्यांच्या जागी मुस्तफिजूर रहमान आणि शार्दुल ठाकुरचे पुनरागमन झाले आहे. तर समीर रिजवीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे केकेआरने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news