Chandrayaan-3 : लँडिंग वेळी ‘विक्रम’ने उडवला २ टन ‘धुरळा’

Chandrayaan-3 : लँडिंग वेळी ‘विक्रम’ने उडवला २ टन ‘धुरळा’

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान ३ मिशनचे विक्रम लँडर २३ ऑगस्टला चंद्रावर उतरले. विक्रमने चंद्रावर उतरताना चंद्राच्या पृष्ठभागावरील २ टन माती आणि दगड यांचा 'धुरळा' उडवला होता, त्यामुळे लँडरच्या आजूबाजूला चमकदार जागा तयार झाली होती, अशी माहिती इस्रोने दिली आहे. (Chandrayaan-3)

विकम्रने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरू केला. चंद्रावर उतरताना थ्रस्टर सक्रिय झाले, त्यामुळे सहाजिकच चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगड वातावरणात उडाले होते. या माती आणि दगडांना epi-regolith असे म्हटले जाते. तर यामुळे जी चमकदार पोकळी निर्माण झाली, त्याला ejecta halo असे म्हटले जाते.

इस्रोने म्हटले आहे, "23 ऑगस्टला लँडर चंद्रावर उतरले, त्यामुळे चमकदार असे ejecta halo तयार झाले. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या संशोधकांचा अंदाज आहे, हा धुरळा २.०६ टन इतका असावा. हा धुरळा त्यानंतर १०८.४ चौरस मीटर इतक्या परिसरात विखुरला गेला." (Chandrayaan-3)

चंद्रायन २ची ऑर्बिटर कार्यरत आहे, या ऑर्बिटरवरील कॅमेऱ्याच्या सहायाने संशोधकांना याचे फोटो घेता आले आहेत. लँडर चंद्रावर उतरण्यापूर्वीचे फोटो आणि लँडर उतल्यानंतरचे फोटो यांची तुलना करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, दगड यांचे स्वरूप कसे आहे, चंद्रावरील भूगर्भीय स्थिती कशी आहे, यावर यातून अभ्यास केला जाणार आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावरील बलांचे काम कसे चालते, याचाही अभ्यास यातून शक्य होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news