पुढारी ऑनलाईन: चांद्रयान-3 चे आज (दि.१४ जुलै) श्रीहरीकोटा येथील सतिशधवन केंद्रातून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. दरम्यान या मोहिमेसाठी देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. सगळ्यांनाच या मोहिमेची उत्सुकता लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ऐतिहासिक मोहिमेसाठी (Chandrayaan-3) ट्विटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
पीएम मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! या ऐतिहासिकक्षणी मी तुम्हा सर्वांना या मिशनबद्दल आणि अंतराळ, विज्ञान आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अधिक जाणून घेण्याची विनंती करतो. भारताच्या अंतराळ क्षेत्रासंबंधी (Chandrayaan-3) जाणून घेतल्यास तुम्हा सर्वांना खूप अभिमान वाटेल, असेही ते म्हणाले.
शुक्रवार 14 जुलै 2023 हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित असेल, तो सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. चांद्रयान-३ ही आपली तिसरी चंद्र मोहीम असून, ती आज आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे उल्लेखनीय मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने घेऊन पुढे (Chandrayaan-3) जाईल, असे देखील पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
चांद्रयाण प्रक्षेपणासाठी तयार असल्याची माहिती इस्त्रोच्या या मोहिमेतील टीमकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज श्रीहरीकोटा येथील सतिशधवन केंद्रातून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण होईल. त्यानंतर उद्यापासून या मिशनची उलटी गिनती सुरू होईल, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरवरून दिली आहे.