Chandrayaan-3 : पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून पाहणार ‘चांद्रयान-3’ चे लाईव्ह लँडिंग

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'चांद्रयान-३' साठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही लँडिंगचा कार्यक्रम लाईव्ह पाहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आयोजित १५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि त्याचवेळी खर्‍या अर्थाने भारत विश्वविक्रमादित्य ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सर्वात आव्हानात्मक मोहीम आता अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांना प्रतीक्षा आहे ती, यशस्वी, सफल लँडिंगची! चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच आजची सायंकाळ विशेष उत्कंठापूर्ण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दक्षिण आफ्रिकेतून 'चांद्रयान-3' चे लाईव्ह लँडिंग पाहणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news