Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-३ च्या पहिल्या संशोधनाची ‘इस्रो’ने दिली मोठी अपडेट

Chandrayaan-3 Mission
Chandrayaan-3 Mission

पुढारी ऑनलाईन: चांद्रयान-३ मोहिम फत्ते झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशाेधन संस्‍था 'इस्रो'ने चांद्रयान संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट त्यांच्या अधिकृत 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून देत आहे. आज ( दि. २७) दुपारी इस्रोने या मोहिमेतील प्रयोगादरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाची निरीक्षणे नोंदवल्याची मोठी अपडेट इस्रोने दिली आहे. दरम्यान, इस्रोने चंद्रावरील तापमानाचा (Chandrayaan-3 Mission) आलेख देखील 'X' वर प्रसिद्ध केला आहे.

इस्रोने 'X' वर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरच्या ऑनबोर्ड ChaSTE पेलोने पहिली निरीक्षणे नोंदवली आहे. चंद्राचा पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोगाच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मल वर्तन समजून घेण्यात आले आहे. याच्या माध्यमातून दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या पृष्ठावरील मातीचे तापमान मोजण्यात (Chandrayaan-3 Mission) आले आहे. इस्रोने दिलेल्या आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान अंदाजे '५०' अंश सेल्सिअस आहे. तर जसजसे चंद्राच्या पृष्ठभागाच्या खोलात जाऊ तसे तापमान झपाट्याने घसरते. चंद्राच्या पृष्ठाच्या ८० मिमीवर तापमान ' -१० ' अंश सेल्सिअस असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

इस्रोने प्रसिद्ध केलेल्या आलेखात चंद्राच्या पृष्ठभागाचा, नजीकच्या पृष्ठभागाच्या विविध खोलीवरील तापमानातील फरक दर्शविला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवासाठी अशा प्रकारचे हे पहिलेच निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दरम्यान सविस्तर निरीक्षण सुरू (Chandrayaan-3 Mission) आहे, असेही इस्रोने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news