कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलावली प्रमुख नेत्यांची बैठक

कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलावली प्रमुख नेत्यांची बैठक
Published on
Updated on

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसापूर्वीच कर्करोगाने निधन झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची आज सकाळी अकरा वाजल्यापासून कोथरूड येथील निवासस्थानी बैठक सुरु आहे. ही बैठक कसबा मतदारसंघात उमेदवार निश्चिती करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे शहरातील सर्व प्रमुख नेते बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news