सांगलीत महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार? दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला

सांगलीत महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार? दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला
Published on
Updated on

सांगली/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : हमखास निवडून येणार्‍या काही जागा ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गटाने घेतल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष आहे. सांगलीतून काँग्रेसच्या उमेदवाराने अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नये, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. त्यामुळे सांगलीची जागा ठाकरे गटच लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात मोठी फूट पडलेली असतानाही जागावाटपात त्यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली. हे दोन पक्ष जवळपास 32 जागा लढविणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला 16 च्या आसपास जागा येतील. त्यातही सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, दक्षिण मुंबई या जागा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने घेतल्या आहेत. याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. तेव्हाही या नेत्यांनी, काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत आता दिल्लीत बैठक होणार नाही.

जागांबाबत ताणू नका

राज्यातील लोकसभेच्या काही जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या असल्या, तरी सबुरीने घ्या. इंडिया आघाडीला धक्का बसेल, इतपत जागांसाठी जास्त ताणू नका, भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडी महत्त्वाची आहे, असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना मंगळवारी दिले. त्यामुळे सांगली, भिवंडीसह मुंबईतील तीन अशा एकूण पाच जागांचा आग्रह काँग्रेस सोडून देण्याची चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news