पुढारी ऑनलाईन डेस्क : चंदीगड वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज (दि. ४) भाजपने बाजी मारली. भाजपचे उमेदवार कुलजीत सिंग संधू यांना १९ मते मिळाली. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचे एक मत रद्द करण्यात आले. आप आणि काँग्रेस आघाडीलाला 16 मते मिळाली. एक मत अवैध ठरले.
चंदीगड वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची अधिकृत 17 मते होती. तसेच भाजप खासदार किरण खेर यांनाही सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार होता. अशा प्रकारे भाजपकडे एकू 18 मते होती, मात्र भाजपला 19 मते मिळाली. यावरून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या छावणीतील नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य कोणत्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही अकाली दलाचे हरदीप सिंग यांनी पुन्हा भाजपला मतदान केल्याची चर्चा आहे.
उपमहापौरपदासाठी आप आणि काँग्रेस आघाडीच्या वतीने निर्मला देवी तर भाजपच्या वतीने राजिंदर शर्मा निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीतही भाजपच्या राजिंदर शर्मा यांचा विजय झाला. त्यांना १९ मते पडली. तर आप आणि काँग्रेस आघाडीला १७ मतांवर समाधान मानावे लागले.
यापूर्वी चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते, मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर आम आदमी पक्षाचे कुलदीपकुमार टिटा यांना महापौरपदी घोषित केले. निवडणुकीत घोटाळा झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.
हेही वाचा :