Sarathi : आणखी किती दिवस आंदोलन करायचे?

Sarathi : आणखी किती दिवस आंदोलन करायचे?

कोल्हापूर : 'सारथी'च्या संशोधक विद्यार्थ्यांचे 40 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. आणखी किती दिवस आंदोलन करायचे? असा सवाल या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. (Sarathi)

'सारथी'अंतर्गत संशोधन वाढीस लागण्यासाठी व उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाची टक्केवारी वाढावी, यासाठी 2019 पासून पीएच.डी. करणार्‍या होतकरू कुणबी मराठा विद्यार्थ्यांना 2019 ते 2021 या कालावधीत 2 हजार 132 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आली. आतापर्यंत 2019 (503 विद्यार्थी), 2020 (204), 2021 (551) व 2022 मध्ये 851 विद्यार्थ्यांच्या बॅचला सरसकट फेलोशिप दिली गेली आहे. याचा चांगल्याप्रकारे सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढून 1,400 च्या वर गेली आहे. (Sarathi)

1 जून 2023 रोजी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या योजनांमध्ये सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'सारथी'अंतर्गत दरवर्षी फक्त 50 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला. कोल्हापूर, पुणेसह इतर ठिकाणच्या विद्यार्थी आंदोलनानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत 1,312 पात्र विद्यार्थ्यांमधून फक्त 200 विद्यार्थी सीईटी परीक्षेद्वारे घेण्याचे जाहीर केले. बार्टी व महाज्योतीमधील समाजाला आरक्षणासह इतर शैक्षणिक सवलती आहेत. परंतु, मराठा समाजाला आरक्षण नाही, शैक्षणिक सवलती कमी आहेत. लोकसंख्येचा विचार केला जात नाही. त्यामुळे शासन 'सारथी'मध्ये समान धोरण राबवू शकत नाही. हा निर्णय अन्यायकारक असून, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहापासून लांब ठेवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news