पुढारी ऑनलाईन डेस्क : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा समारोहासाठी आज सोमवारी (दि. २२) जानेवारी रोजी अयोध्या नगरी सजली आहे. या खास सोहळ्याची जोरदार तयारी झाली असून राजकिय नेत्यांसोबत बॉलिवूड सेलेब्रिटींनी अनेकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली आहे. २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देश ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा होत आहे. अयोध्येत देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत दाखल झाल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. मात्र, हे राम मंदिर बांधण्यासाठी गेल्या काही दिवसापासून अनेकांनी आपले कसब दाखविले आहे. याच दरम्यान त्याच्या उभारणीस अनेक स्टार्सनी देणगी देवून सहकार्य केलं आहे. यामुळे पाहूयात कोण-कोण स्टार्सचा यात समावेश आहे. ( Ayodhya Ram Mandir )
संबंधित बातम्या
बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री माधुरी दीक्षित, बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक कपूर, रोहित शेट्टी, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, विकी कौशल, कॅटरीना कैफ, थलैवा रजनीकांत, मुकेश अंबानी, साऊथ स्टार चिरंजीवी, पवन कल्याण, माजी क्रिकेटर अनिल कुंबळे, साऊथ स्टार राम चरण, राजकुमार हिरानी, महावीर जैन, सचिन तेंडुलकर हे अयोध्येत पोहोचले आहेत. याचे अनेक व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( Ayodhya Ram Mandir )
श्री. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत ११०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी अजून ३०० कोटी रुपये लागणार आहेत. दरम्यान मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांनी देणगी म्हणून भरघोष रक्कम दान केलं आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर आणि गुरमीत चौधरी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने २००१ मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी देऊन छोटीशी सुरुवात केल्याचे सांगितले होतं. तसेच यावेळी अनेक जण यासाठी हातभार लावू शकतात असेही यावेळी म्हणाले होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'आमच्या श्रीरामाच्या भव्य मंदिराचे अयोध्येत बांधकाम सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. आता आपले योगदान देण्याची वेळ आहे. मी सुरुवात केली आहे, आशा आहे की, तुम्हीही आमच्यात सहभागी व्हाल. जय सिया राम.'
प्रणिता सुभाष
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी २०२३ मध्ये अयोध्येला गेले होते आणि तिथून एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत राम मंदिर बांधकामादरम्यान एक झलक दाखवण्यात आली होती. याचदरम्यान एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अनुपम खेर यांनी काही रक्कम दान केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय प्रणिता सुभाष यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
मुकेश खन्ना आणि हेमा मालिनी यांचे योगदान
'शक्तीमान' फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर ट्विट करून मंदिराच्या बांधकामासाठी १ लाख १ हजार रुपयांची देगणी दिल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी भागातील अनेकांनी देणगी देण्याचे आवाहनही केलं आहे. मुकेशशिवाय पवन कल्याण यांनी ३० लाख रुपयांची देणगी दिली आहे. दरम्यान बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी, गुरमीत चौधरी, मनोज जोशी यांनी काही रक्कम दान केली आहे. परंतु, नेमकी या स्टार्सकडून किती रक्कम दान केली यांची माहिती समोर आलेली नाही.