पुढारी ऑनलाईन : सततचा पाऊस हा 'नैसर्गिक आपत्ती' म्हणून जाहीर झाली असून, यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. आज (दि.१६) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.