Byju’s चे CEO बायजू रवींद्रन अडचणीत; ED चे लुकआउट सर्कुलर जारी करण्याचे निर्देश

Byju's News
Byju's News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ब्युरो ऑफ इमिग्रेशन (BOI) ला एडटेक कंपनी Byju चे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे Byju's संस्थापकांच्या अडणीत वाढ झाली आहे. अडचणीत असलेल्या एडटेक कंपनीच्या संस्थापकाने देश सोडू नये याची खात्री करण्यासाठी ईडीने बायजू रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Byju's News)

Byju's News : कंपनीकडून FEMA कायद्याचे उल्लंघन, ईडीचा आरोप

ईडीने नोटीसमध्ये म्हटले आहे की, "कंपनीने नमूद केले होते की, त्यांनी भारताबाहेर महत्त्वपूर्ण परदेशी निधी पाठवला आणि परदेशात गुंतवणूक केली, जी FEMA, 1999 च्या तरतुदींचे कथित उल्लंघन करते आणि त्यामुळे भारत सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले आहे". (Byju's News)

Byju's 'सीईओ'ना काढून टाकण्याची गुंतवणूकदारांची मागणी

एप्रिल 2023 च्या छापेमारीनंतर ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, बायजूच्या फेमा शोधातून असे दिसून आले की, कंपनीला 2011 ते 2023 पर्यंत सुमारे 28,000 रुपये कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. यामधून कंपनीने विविध देशांना 9,754 रुपये कोटी पाठवले आहेत. याच काळात त्यांनी थेट परकीय गुंतवणुकीच्या नावावर दावा केला होता. आता बायजू रवींद्रन यांच्याविरुद्ध लूकआऊट सर्कुलर बजावण्यास सांगण्यात आले आहे. बायजूच्या काही गुंतवणूकदारांनी त्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. यामुळे रवींद्रन यांना या शुक्रवारी (दि.२३) हाय-व्होल्टेज ईजीएमला सामोरे जावे लागणार आहे. रवींद्रन गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली आणि दुबई दरम्यान प्रवास करत आहेत, असे इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. (Byju's News)

लूक आउट सर्कुलर म्हणजे काय?

लूक आउट सर्कुलर म्हणजे 'सरकारी तपास यंत्रणांनी जारी केलेले पत्र' आहे. याला सामान्य भाषेत लुक आउट नोटीस असेही म्हणतात. लुक आउट सर्कल जारी करून, अधिकारी हे सुनिश्चित करू शकतात की प्रकरणाशी संबंधित व्यक्ती देश सोडून जाणार नाही. हे परिपत्रक बहुतेकदा अशा प्रकरणांमध्ये जारी केले जाते जेव्हा अधिकाऱ्यांना तपासादरम्यान आरोपी व्यक्ती देशातून फरार झाल्याचा संशय येतो.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news