Byju’s कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

Byju's Lay Off
Byju's Lay Off

पुढारी ऑनलाईन डेस्क : एज्युकेशन टेक्नॉलिजीमधील प्रमुख कंपनी BYJU's पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन खर्च कपात धोरणामुळे ४ हजार कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ देत त्यांना घरी पाठवण्याच्या तयारीत आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. BYJU's कंपनीच्या नवीन धोरणामुळे सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. कंपनीचे भारतीय सीईओ अर्जुन मोहन यांनी कंपनीची पुनर्रचना आणि खर्च कपात करण्याची योजना आखली असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे. (Byju's Layoff)

Byju's Layoff : 11 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार?

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, मागच्याच आठवड्यात अर्जुन मोहन यांची भारतातील Byju's कंपनीच्या सीईओपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या दृष्टीने नवीन योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या योजनेची माहिती दिली आहे. यानुसार कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. यानुसार, Byju's पुढील काही आठवड्यात सुमारे ४ हजार कर्मचारी किंवा एकूण कर्मचार्‍यांपैकी 11 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे समोर आलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (Byju's Layoff)

कंपनी व्यवसाय पुनर्रचनेच्या अंतिम टप्प्यात-  Byju's प्रवक्त्याचे स्पष्टीकरण

या संदर्भातील माहिती देताना Byju's च्या प्रवक्त्याने प्रभावित होणार्‍या कर्मचार्‍यांची एकूण संख्या उघड करण्यास नकार दिला आहे. परंतु कंपनी व्यवसाय पुनर्रचना करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्याने सांगितले. पुढे कंपनी प्रवक्त्याने कंपनीचे ऑपरेटिंग स्ट्रक्चर्स सुलभ करण्यासाठी, खर्चाचा भार कमी करण्यासाठी आणि रोख प्रवाहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही व्यवसाय पुनर्रचनेच्या अंतिम टप्प्यात आहोत, असे म्हटले आहे. तसेच "Byju चे नवे इंडिया CEO, अर्जुन मोहन, पुढील काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करतील आणि पुढे एक सुधारित आणि शाश्वत ऑपरेशन चालवतील, असेही कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news