Satwik-Chirag No. 1 Rankings : सात्विक-चिराग जोडी BWF जागतिक क्रमवारीत बनली नंबर-1

Satwik-Chirag No. 1 Rankings : सात्विक-चिराग जोडी BWF जागतिक क्रमवारीत बनली नंबर-1

पुढारी ऑनलाईन डेस्क : Satwik-Chirag No. 1 Rankings : भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मंगळवारी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF)च्या जागतिक क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेऊन अव्वल स्थान पटकावले आहे. हा पराक्रम करणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. हँगझोऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीमध्ये सात्विक-चिराग जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यानंतर भारतीय जोडीला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे अवघ्या तीन दिवसातच पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अॅड्रिएंटो यांना मागे टाकले आहे.

2022 पासून चमकदार कामगिरी (Satwik-Chirag No. 1 Rankings)

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सात्विक-चिराग जोडीने दक्षिण कोरियाच्या चोई सोल-ग्यु आणि किम वोन-हो यांचा 21-18, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सात्विकसाईराज आणि चिराग 2022 पासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. या जोडीने इंडियन ओपन, फ्रेंच ओपन, स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन आणि कोरिया ओपनसह पाच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरचे खिताब जिंकले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, इंडोनेशिया ओपनमधील त्याच्या विजयाने पुरुष दुहेरीत भारताला पहिले बीडब्ल्यूएफ सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद मिळवले.

यापूर्वी एकेरीत माजी बॅडमिंटनपट्टू प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी बीडब्ल्यूएफाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यांच्यानंतर अव्वल स्थान गाठणारे सात्विज-चिराग चौथे भारतीय खेळाडू ठरले आहेत. (Satwik-Chirag No. 1 Rankings)

1962 ते 2018 पर्यंत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या बॅडमिंटनमध्ये फक्त एक रौप्य आणि नऊ कांस्य पदके जिंकली. मात्र, हँगझोऊमध्ये भारतीय खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा सर्व पदकांवर मोहोर उमटवली. त्यामुळे भारतासाठी ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली आहे. सात्विक आणि चिराग यांनी या वर्षी 18 स्पर्धांतून 92,411 गुण मिळवले आहेत, जे दुसऱ्या स्थानावर असलेल्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांतो यांच्यापेक्षा 2,000 गुणांनी पुढे आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news