रायगड : खारघरमधील हायवे ब्रेक हॉटेल जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

रायगड
रायगड

पनवेल ः पुढारी वृत्तसेवा :  खारघर मधील नामप्रसिद्ध हायवे ब्रेक हॉटेलेला रविवारी मध्यरात्री दोनच्या दीड ते दोनच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे. या आगीमध्ये हायवे ब्रेक हॉटेल जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

संबंधित बातम्या 

खारघर सेक्टर 10 येथे असलेल्या हॉटेलला मध्यरात्री आग लागली. या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे मात्र या आगीमध्ये हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

खारघर शहरातील नेहमी गजबजलेल असलेल्या सेक्टर दहा परिसरातील हायवे ब्रेक हॉटेलला आग लागली. रात्रीच्या सुमारास सर्व काम आटोपून कामगार हॉटेल बंद करून घरी गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलला अचानक आग लागली. अग्निशामक दलाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामक जवानांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणले. या लागलेल्या भीषण आगीत हॉटेलमधील फ्रिज, खाण्याचे साहित्य, टेबल, खुर्च्या यांच्यासह स्वयंपाक तयार करण्याचे भांडी आदी साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news