जाहिरातीत बर्गर दाखवला माेठा, विक्रीवेळी झाला छाेटा! न्‍यायालय म्‍हणाले, ‘बर्गर किंग’ हाजीर हो…

जाहिरातीत बर्गर दाखवला माेठा, विक्रीवेळी झाला छाेटा! न्‍यायालय म्‍हणाले, ‘बर्गर किंग’ हाजीर हो…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फास्‍ट फूडमधील दिग्‍गज कंपनी म्‍हणून ओळख असणार्‍या 'बर्गर किंग'ला (Burger King) आता खटल्‍याला सामोरे जावे लागणार आहे. जाहिरातीमध्‍ये माेठा बर्गर दाखवला मात्र  वास्तवात लहान बर्गर दिल्‍याचा दावा करत ग्राहकाने कंपनीविरोधात अमेरिकेतील मियामी कोर्टात खटला दाखल केला आहे. न्‍यायालयानेही कंपनीला खटल्‍याला सामोरे जावे लागले, असे स्‍पष्‍ट केले असल्‍याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले आहे.

बर्गर किंगवर (Burger King) आरोप आहे की, टीव्‍ही आणि ऑनलाइन जाहिरातीमध्‍ये मेनूमध्‍ये दाखविण्‍यात आलेला हूपर बर्गर हा वास्‍तविक ग्राहकांना विक्रीला असणार्‍या बर्गरपेक्षा मोठा दाखविण्‍यात आला आहे. या बर्गरमध्‍ये मासांहारी पदार्थ अतिरिक्‍त दाखवून ग्राहकांना आकर्षित करते. बर्गर हे ३५ टक्‍के मोठे दाखविण्‍यात आले आहे; परंतु ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकांना स्टोअरमधील मेनू बोर्डवर प्रदर्शित केलेल्या चित्रापेक्षा लहान व्हॉपर सँडविच दिले जात आहे. ही ग्राहकांची दिशाभूल असल्‍याची तक्रार ग्राहकाने केली आहे.

Burger King कंपनीने फेटाळले आरोप

बर्गर किंगने आपल्या टीव्‍ही आणि ऑनलाइन जाहिरातींद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याचे आरोप कंपनीने फेटाळले आहेत. बर्गर किंगच्‍या प्रवक्‍त्‍यांनी म्‍हटलं आहे की, आमच्‍या जाहिरातींमध्‍ये दाखविण्‍यात आलेले फ्‍लेम-ग्रील्‍ड बीफ पॅटीज हेच पॅटज आहेत. कंपनीने या हूपर बर्गचे वर्णन सर्वांवर राज्‍य करणाबे बर्गर असे केले आहे.

खटल्‍याला सामोरे जावे लागणार : न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

मियामी कोर्टाचे न्‍यायमूर्ती रॉय ऑल्टमन म्हणाले की, कंपनीला खटल्‍याला सामोरे जावे लागले. कंपनीने आपल्यावरील आरोपांच्या बचावात उत्तर द्यावे. जेणे करून तो स्वत:वर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध करू शकेल. कंपनीने हे देखील सिद्ध केले पाहिजे की स्टोअरमधील मेनू बोर्डवर प्रदर्शित केलेले व्हूपर्सचे चित्र ग्राहकांची दिशाभूल करणारे नाही.

बर्गर किंग आणि त्याच्या वकिलांनी मंगळवार, २९ ऑगस्‍ट रोजी टिप्पणीसाठी केलेल्या विनंत्यांना तत्‍काळ प्रतिसाद दिला नाही. तर, फिर्यादीचे वकील देखील न्यायालयात उपस्‍थित नव्हते. या प्रकरणी पहिल्या करारासाठी मध्यस्थीही करण्यात आली होती, मात्र ती अयशस्वी ठरली.

अन्‍य फास्‍ट फूड कंपन्‍यांनाही करावा लागला आहे खटल्‍यांचा सामना

मॅकडोनाल्ड्स, टॅको बेल आणि वेंडीज सारख्या काही इतर फास्ट फूड साखळींना अलीकडेच खोट्या जाहिरातींच्या
खटल्‍यावरून अमेरिकेमध्ये अशाच प्रकारच्या खटल्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी, एका ग्राहकाने मॅकडोनाल्ड्स आणि वेंडीज विरुद्ध क्लास ॲक्शन खटला दाखल केला, दोन कंपन्यांवर अन्यायकारक आणि चुकीची माहिती देणार्‍या जाहिराती केल्‍याचा आरोप केला होता. मॅकडोनाल्ड आणि वेंडीचे बर्गर जाहिरातींमध्‍ये दाखवलेल्‍या बर्गरपेक्षा 15% कमी असल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news