बुलढाणा : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू

बुलढाणा : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू
Published on
Updated on

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जानेफळ गावी नवरात्रीनिमित्त गरबा आयोजित केला होता. यावेळी गरबा खेळत असताना रविवारी रात्री एका ४७ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विशाल पडधारिया (वय ४७) असे मृत  हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या आकस्मिक घटनेमुळे क्षणभरातच गरबास्थळी शोकाकूल वातावरण झाले.

जानेफळ येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व मूळचे गुजरात राज्याचे निवासी विशाल पडधारिया उर्फ बाबूभैय्या यांना गायनाचा व पारंपरिक वाद्ये वाजवण्याचा छंद होता. गेल्या २५ वर्षापासून नवरात्रीत देवीची स्थापना करून त्यांनी अनेकांना गरबा-दांडिया हा खेळ प्रकार शिकवला. रविवारी रात्री गावातील वीर सावरकर दुर्गा मंडळासमोर ते गरबा खेळत होते. यावेळी विशाल यांना अचानक भोवळ आली. गरबास्थळावरील अन्य उपस्थितांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. जानेफळ येथील व्यावसायिकांनी आज सोमवारी स्थानिक बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news