Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर एसी लोकलच्या तिकीट दरात कपात?

Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर एसी लोकलच्या तिकीट दरात कपात?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एसी लोकलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी तिकीट दरात कपात करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) एसी लोकलच्या एकेरी प्रवासासाठी काढण्यात येणार्‍या तिकिटाचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे.

एसी लोकलचे तिकिट दर सामान्य लोकलपेक्षा 1.3 पट जास्त आहे. तसेच एसी लोकलकरिता सामान्य लोकलच्या फेर्‍या रद्द केल्या जातात. त्यामुळे मुंबईकरांनी एसी लोकलकडे पाठ फिरविली आहे. (Budget 2022)

सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 20 फेर्‍या होतात.तर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यान देखील एसी लोकल धावत आहे. परंतु या एसी लोकलला दिवसाला फक्त 50 ते 55 प्रवासी मिळत आहेत.

गेल्या जून महिन्यात उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलबाबत झालेल्या सर्वेेक्षणात 52 टक्के प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकिट दरात कपात करण्याचे मत नोंदविले होते.त्यानुसार रेल्वे बोर्डाने एसी लोकलचे तिकीट दर मेट्रोप्रमाणे आकारण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे अर्थसंकल्पानंतर महापालिका निवडणुकीच्या तोडांवर एसी लोकलच्या तिकीट दरात कपात होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news