Budget 2022 : ई-वाहनांना बॅटरी बदलण्याची परवानगी देणार

Budget 2022 : ई-वाहनांना बॅटरी बदण्याची परवानगी देणार
Budget 2022 : ई-वाहनांना बॅटरी बदण्याची परवानगी देणार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सुरुवातीला ज्यांना COVID19 चे आरोग्यविषयक आणि आर्थिक दुष्परिणाम सोसावे लागले त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर सीतारामन यांनी Budget 2022 सादर करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या.

इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅटरी चार्जिंग स्टेशन मोठ्या प्रमाणात स्थापण करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणण्यात येईल, तसेच सार्वजनिक वाहतूक सुविधेत इलेक्ट्रीक वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

  • अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स आणइ कॉमिक्स यांच्या एव्हीजीसी सेक्टरला प्रोत्साहन देणार.
  • दुर्गम भागात परवडणाऱ्या ब्रॉडबॅण्ड आणि #मोबाईल सेवेसाठी संशोधन आणि विकासाला प्राधान्य.
  • २०२५ पर्यंत गावांमध्ये ऑपटिकल फायबर जोडणीचं काम पूर्ण होणार
  • #AatmaNirbharBharat उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना, पीएलआयला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
  • येत्या पाच वर्षात ६० लाख नवे रोजगार आणि ३० लाख कोटीच्या अतिरिक्त उत्पादनाची क्षमता यामध्ये आहे- केंद्रीय वित्तमंत्री
  • २०२२-२३ मध्ये ५-जी मोबाईल सेवेसाठी स्पेक्ट्रम लिलाव.
  • ५-जी तंत्रज्ञानामुळे विकास आणि रोजगाराच्या संधी.
  • पुढील 3 वर्षात उर्जा कार्यक्षम आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या 400 अत्याधुनिक वंदे भारत ट्रेनचे उत्पादन करण्यात येईल
  • पुढील 3 वर्षात 100 #PMGatiShakti कार्गो टर्मिनल विकसित करण्यात येतील
  • सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम हाती घेतला जाणार
  • पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा याचा उद्देश आहे
  • 2022-23 साठी 60 किमीच्या 8 रोपवेचे बांधकाम प्रस्तावित आहे
  • टेलीकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्धी करणार
  • रासायनीक खते आणि किटकनाशके मुक्त शेती करण्याला प्रोत्साहन देणार
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देणार
  • ई-वाहनांना बॅटरी बदण्याची परवानगी देणार
  • कृषी क्षेत्रासाठी मोठी घोषणा, किसन ड्रोन द्वारे शेतीच्या उत्पादकतेचा आढावा घेणार. तसेच, शेती क्षेत्रात स्टार्टअपना चालना देणार.
  • पीएम ईविद्या एका चॅनेलचे २०० चॅनेल्स सुरू करणार असून पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणार.
  • विद्यार्थ्यांसाठी ई कंटेंट तयार करणार, तसेच डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार.
  • पंतप्रधान आवास अंतर्गत ८० लाख घरे बांधणार, ४८ हजार कोटींचा निधी देणार
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ डिजिटल जिल्ह्यांत ७५ डिजिटल बँकिंग केंद्र सुरू करणार.
  • एक उत्पादन, एक रेल्वे स्टेशन ही योजना लागू केली जाईल, तसेच 400 नवीन वंदे भारत ट्रेन सादर केल्या जातील : अर्थमंत्री
  • आमच्या सरकारचा सामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणावर भर.
  • पंतप्रधान #गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर.
  • या अर्थसंकल्पात स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांचा दृष्टिकोन.
  • एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार.
  • हा अर्थसंकल्प भविष्यानुरुप आणि सर्व समावेशक आहे.
  • खासगी गुंतवणुकीतून लोकांना सहाय्या देण्याचा प्रयत्न.
  • #AatmaNirbharBharat उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना, पीएलआयला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
  • येत्या पाच वर्षात 60 लाख नवे रोजगार आणि 30 लाख कोटीच्या अतिरिक्त उत्पादनाची क्षमता यामध्ये आहे.
  • मधल्या काळात पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी सार्वजनिक गुंतवणुकीवर भर देण्याचा अर्थसंकल्पाचा निर्धार..
  • #PMGatiShakti अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेईल आणि युवा वर्गासाठी अधिक रोजगार आणि संधी निर्माण करेल
  • #Budget2021 चा दृष्टिकोन जारी राखत, #Budget2022 येत्या 25 वर्षाच्या अमृत काळासाठी, स्वतंत्र भारताच्या 75 ते 100 व्या वर्षापर्यंत अर्थव्यवस्थेला मार्गदर्शन करण्याचा पाया घालणारा आहे
  • चालू वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च, 9.2% अपेक्षित आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news