![पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2FCrime-4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील चंदननगर परिसरात पतीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी केशव सीताफळे ( पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.