पुढारी ऑनलाइन डेस्क : ट्विटर वर सध्या हृतिक रोशनला बॉयकॉट करण्याचा "#BoyKothriTikRoshan" ट्रेंड सुरू आहे. आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाला सपोर्ट केल्याबद्दल हृतिक रोशनला बॉयकॉट करा, असा ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे.
इंटरनेटवर सतत काही ना काही नवीन ट्रेंड सुरू असतात. यामध्ये एखाद्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ट्रेंड येतात. विशेषकरून चित्रपटात जर एखाद्या विशिष्ट समुदायाच्या धार्मिक-जातीय भावना दुखावल्या असतील तर त्याला विरोध करण्यासाठी तो चित्रपट बॉयकॉट करा, असे आवाहन ट्विटरवरून करतात.
आमीर खानच्या पत्नीने देशात असहिष्णूता खूप वाढली आहे त्यामुळे हा देश सोडून निघून जाऊ, असे आमीर खानने म्हटले होते. त्यासाठी तसेच लालसिंग चढ्ढा चित्रपटातील काही आक्षेपार्ह संवादांमुळे हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड होता.
हृतिक रोशनने एक ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने लाल सिंग चढ्ढा पाहिला. हा चित्रपट पाहून माझे हृदय भरून आले. अतिशय सुंदर चित्रपट आहे. तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहावा, असे आवाहन त्याने केले."#BoyKothriTikRoshan"
हृतिक रोशनच्या या ट्विटमुळे लाल सिंग चढ्ढाचे ट्विटरवरील विरोधक हृतिक रोशनवर संतापले आहे. त्यांनी #BoyKothriTikRoshan" हा ट्रेंड सुरू केला आहे. तसेच अनेक जणांनी हृतिक रोशनच्या आगामी विक्रम वेढा चित्रपटाचा बहिष्कार करण्याबाबतही भाष्य केले आहे.