‘इंडिया’ आघाडीत ‘मतभेद’! न्‍यूज अँकर बहिष्‍कारप्रकरणी नितीश कुमार म्‍हणाले. “मला याबद्दल …”

‘इंडिया’ आघाडीत ‘मतभेद’! न्‍यूज अँकर बहिष्‍कारप्रकरणी नितीश कुमार म्‍हणाले. “मला याबद्दल …”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडिया आघाडीने नुकतेच एक निवदेन प्रसिद्ध करुन अनेक टीव्‍ही न्‍यूज अँकरवर बहिष्‍कार घालण्‍याची घोषणा केली आहे. बहिष्‍कार घालण्‍यात आलेल्‍या टीव्‍ही न्‍यूज अँकरच्‍या कार्यक्रमात सहभागी न होण्‍याचा निर्धार केला आहे. याबाबत आज बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केले.

मी पत्रकारांच्या समर्थनात : नितीश कुमार

माध्‍यमांशी बोलताना नितीशकुमार म्‍हणाले की, "मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी पत्रकारांच्या समर्थनात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज बिहारमधील आपल्‍या जाहीर सभेत नितीशकुमारावर बोचरी टीका केली. याबाबत विचारले असता नितीशकुमार म्‍हणाले की, "त्याकडे लक्ष देऊ नका. मी त्यांच्या काेणत्‍याही विधानांवर लक्ष देत नाही. जेव्हा ते येतात तेव्हा ते मूर्खपणाचे बोलतात. बिहारच्या विकासाची माहिती त्‍यांना आहे का, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news