नववीतील मुलावर शाळेतील मुलाने केला कोयत्याने वार, आंबेगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

file photo
file photo
Published on
Updated on

मंचर, पुढारी वृत्तसेवा: अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ विद्यालयात शिकणाऱ्या कुणाल विकास कराळे (वय १५) या इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतीलच दहावीत शिकणाऱ्या मुलाने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. २८) दुपारी घडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या डोक्याला, हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जखमी कुणाल कराळे आणि इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा एक महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी शालेय शिक्षकांनी हा वाद मिटवला होता. परंतु संबंधित दहावीतील विद्यार्थ्याने मनात राग धरून कोयता लपवून आणत महाविद्यालयाच्या मैदानात कुणाल पुढे जात असताना पाठीमागून कोयत्याने तीन ते चार वार केले. या हल्ल्यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली. जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

घटनेची माहिती कळताच मंचरचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे , पोलीस जवान तुकाराम मोरे पुढील तपास करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news