Suhana Khan : सुहाना- अगस्त्य नंदाच्या लग्नाची बोलणी?; डेटिंगच्या चर्चेत ‘लव्हबर्ड’ डिनर डेटवर

Suhana Khan
Suhana Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ( Suhana Khan ) आणि बिग बी आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी बॉलिवूडमध्ये एकत्रित काम करून त्याच्या करिअरला सुरुवात केली. सुहाना आणि अगस्त दोघांनी २०२३ मध्ये आलेल्या 'आर्चीज' या कॉमेडी चित्रपटात पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या काळापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. मध्यंतरी सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केलं होते. याच दरम्यान पुन्हा एकदा दोघेजण एकत्रित स्पॉट झाल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे.

'आर्चीज' या चित्रपटानंतर अभिनेत्री सुहाना खान ( Suhana Khan ) आणि अगस्त्य नंदा दोघेजण अनेक वेळा डेट नाईट पार्टी आणि डिनर डेटवर स्पॉट झाले होते. मात्र, दोघांच्याकडून त्याच्या रिलेशनशीपची अधिकृत्त माहिती समोर आलेली नव्हती. दरम्यान सुहानाने तसे काही नसल्याचे सांगत ब्रेकअप झाल्याचे म्हटलं होतं. याच दरम्यान पुन्हा एकदा सुहाना आणि अगस्त नंदा एकत्रित डिनर डेटवर दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काल रात्री दोघेजण एका रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्रित दिसले होते. यादरम्यान अगस्त्य कॅज्युअल लूकमध्ये दिसला. तर सुहाना पापॉराझी कॅमेऱ्यांपासून नजर चोरताना दिसली. यावेळी सुहाना तिच्या कार मधून उतरून थेट हॉटेलच्या आतमध्ये गेली. यावेळी सुहानाने लाल रंगाच्या स्टायलिश टॉपवर पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली होती.

सुहाना आणि अगस्त्याशिवाय झोया अख्तर आणि नव्या नवेली नंदा देखील उपस्थित होत्या. यावरून दोघांच्या लग्नाची बोलणी सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, दोघांच्या रिलेशनशीप आणि लग्नाची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.
सुहानाचा 'आर्चीज' हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शिका झोया अख्तरच्या या चित्रपटात सुहाना आणि अगस्त्यसोबत अभिनेत्री खुशी कपूर, मिहीर आहुजा, विगांग रैना, युवराज मेंडा आणि अदिती यांनी काम केलं आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुहाना लवकरच 'किंग' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात सुहाना वडील आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत अभिनय करताना दिसणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news