मराठा-धनगर समाज समदुःखी : मनोज जरांगे

मराठा-धनगर समाज समदुःखी : मनोज जरांगे

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाज आणि धनगर समाजाचे दुःख सारखेच आहे. या दोन्ही समाजांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकमेकांना साथ दिली पाहिजे, असे आवाहन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केले. जरांगे पाटील यांनी चौंडी येथे शुक्रवारी (दि.6) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेतले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

या वेळी आमदार राम शिंदे यांनी जरांगे यांचे जोरदार स्वागत केले. जरांगे पाटील म्हणाले, की मराठा आणि धनगर या दोन्ही समाजांची आरक्षणाबाबत हेळसांड झाली आहे. प्रत्येक पक्ष सत्तेतून पायउतार झाल्यावर म्हणतो, सत्तेत आल्यावर आरक्षण देऊ. साठ वर्षांपासून हेच सुरू आहे. कधी हे सत्तेत, कधी ते. नेमके आम्हालाच कळेना, आरक्षण देणार कोण? याबाबत धनगर व मराठा समाजाची स्थिती सारखीच आहे. दोन्ही समाजांनी एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. मराठा व धनगर समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news