Gautam Navlakha | एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

Gautam Navlakha | एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना जामीन मंजूर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे येथील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरण आणि २०१८ मधील  एल्गार परिषद प्रकरणी  गौतम नवलखा यांना आज (दि.१९) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ऑगस्ट 2018 मध्ये अटक केलेल्या गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने नवलखा यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळवणारे ते सातवे आरोपी आहेत. Gautam Navlakha

न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, नवलखा यांची जामीनासाठीची याचिका स्वीकारण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी सहा आठवड्यांच्या कालावधीसाठी स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. खंडपीठाने या आदेशाला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. Gautam Navlakha

या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयाने एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी वर्नॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या कार्यकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. 2017-18 भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबे, स्टेन स्वामी, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा आदी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेच्या सदस्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पुणे, दिल्ली आणि भारतातील इतर शहरांमध्ये छापे टाकले होते, ज्यांना माओवाद्यांनी निधी पुरवल्याचा दावा केला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news