Amritsar Blast News | अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ २४ तासांत २ बॉम्बस्फोट

Amritsar Blast News | अमृतसर हादरले! सुवर्ण मंदिराजवळ २४ तासांत २ बॉम्बस्फोट

अमृतसर (पंजाब), पुढारी ऑनलाईन : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ आणखी बॉम्बस्फोट (Amritsar Blast)  झाल्याची घटना घडली आहे. २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शनिवारी रात्री देखील या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. आता पुन्हा सोमवारीही येथून जवळच आणखी एक स्फोट झाला आहे. जागरण हिंदीच्या वृत्तानुसार आज सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट झाला. पोलीस आणि सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. (Amritsar Blast News)

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर अवघ्या २४ तासांत दोन स्फोट झाले. यापूर्वी शनिवारी रात्री अमृतसरमधील हेरिटेज स्ट्रीटवर झालेल्या स्फोटात पर्यटकासह ६ जण जखमी झाले होते. (blast in amritsar heritage street)

आज सकाळी झालेल्या स्फोटावेळी हेरिटेज स्ट्रीटवर अधिक रहदारी नव्हती. या घटनेचा तपास सुरू असून उच्चपदस्थ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी घटनास्थळावरून विविध नमुने गोळा केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Amritsar Blast)

श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात सोमवारी सकाळी ६:३० वाजता पुन्हा स्फोट झाला. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून २०० मीटर अंतरावर हा स्फोट झाला.

दरबार साहिबजवळील हेरिटेज स्ट्रीटवर शनिवारी रात्री झालेल्या स्फोटानंतर भितीचे वातावरण झाले होते. घटनास्थळी उपस्थित अनेक भाविकांनी आणि स्थानिक लोकांनी हा स्फोट दहशतवादी घटना असल्याचे म्हटले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले असून परिस्थिती नियंत्रणात असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस उपायुक्त मेहताब सिंग यांनी सांगितले की, घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरालगतच्या हेरिटेज स्ट्रीटवर शनिवारी मध्यरात्री स्फोट झाला होता. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि निखळल्या होत्या. पोलिस तपासातून हा एक अपघात असल्याचे समोर आले आहे. स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

स्फोटानंतर काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ठिकाण संवदेनशील असल्याने सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला असल्याची चर्चा पसरली होती. पोलिसांनी मात्र ही दुर्घटना असल्याचे म्हटले आहे.

फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने नमुने घेतले आहेत. लवकरच स्फोट कसा झाला व पार्किंगच्या काचा कशा फुटल्या, हे स्पष्ट होईल. मोठा आवाज होऊन काचा फुटल्या तेव्हा हवेत पोटॅशियमचा वास पसरला होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हा वास १० ते १५ मिनिटे कायम होता.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news