पुढारी ऑनलाईन डेस्क: करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत कोरोनाचा विस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टीला गेलेल्या बॉलिवूडमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आणखी काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने सर्वाची तपासणी करण्यात येत आहे. (Corona in Bollywood)
बॉलिवूडचा निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ५०वा वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय, कॅटरिना कैफ, सलमान खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, कार्तिक आर्यन, मलायका अरोरा आणि सीमा सजदेह हे कलाकार पार्टीत दिसले. या पार्टीनंतर कॅटरिना कैफ आणि कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळे पार्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने तपासणी करण्यात येणार आहे. (Corona in Bollywood)
हेही वाचलंत का?