Shraddha Kapoor : ‘कशाचा इतका घमंड?’; रश्मिकाला पाहून श्रद्धाने केलं इग्नोर

Shraddha Kapoor
Shraddha Kapoor

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्द्योगपती मुकेश अंबानी याच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडलं. या उत्सवानिमित्ताने मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनी खास पार्टीचे आयोजन केलं होते. या पार्टीला बॉलिवूड अभिनेता सलमान खानपासून ते ऐश्वर्या रॉयपर्यत सर्वच बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली होती. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील दिमाखात दिसल्या. मात्र, या पार्टीत श्रद्धाने रश्मिका इग्नोर केल्याने तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

संबधित बातम्य़ा 

उद्द्योगपती मुकेश अंबानी यांनी त्याच्या घरी (अँटिलिया ) गणेश उत्वासानिमित्ताने काल संध्याकाळी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीला मुकेश अंबानी आणि निता अंबानी याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, दीपिका पादुकोण, नयनतारा, करिश्मा कपूर, आराध्यासोबत ऐश्वर्या राय, नव्या नंदा, रेखा, अगस्त्या नंदा, यांच्यासह अनेक दिग्गज स्टार्संनी हजेरी लावली. दरम्यानच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रश्मिका मंदाना पार्टीत स्पॉट झाल्या.

या पार्टीत रश्मिकाने व्हाईट रंगाची सुंदर साडी तर श्रद्धाने ( Shraddha Kapoor ) व्हाईट रंगाचा सलवार कमीज परिधान केला होता. दोघीही खूपच सुंदर दिसत होत्या. दरम्यान, व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत श्रद्धाने रश्मिकाशी काहीही न बोलता तिच्या बाजूने निघून जाताना दिसतेय. तर रश्मिकाने यावेळी पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला हॉट पोझ दिली आहे. यावरून श्रद्धाला नेटकऱ्यांनी 'कशाचा इतका घमंड आला आहे?' म्हणत ट्रोल केलं आहे.

एकिकडे युजर्सनी व्हिडिओ पाहून दोघीचे भरभरून कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी श्रद्धाने जाणूनबुजून तिला इग्नोर केल्याने बोलले जात आहे. परंतु, श्रद्धाने असे का केलं? किंवा ती घडबडीत होती का? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news