Shama Sikander : शमा सिकंदरने कास्टिंग काऊचविषयी केला धक्‍कादायक खुलासा, म्‍हणाली…

Shama Sikander
Shama Sikander

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदर ( Shama Sikander ) बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. शमा सिंकदर तिचे हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या ती बॉलिवूड जगतापासून दुर असली तरी ती लवकरच पुन्हा एकदा पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. याच दरम्यान शमाने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचविषयीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री शमा सिकंदरने ( Shama Sikander ) नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडचा खरा चेहरा किंवा बॉलिवूड मागचे सत्य जगासमोर आणले आहे. याविषयी बोलताना तिने सांगितले की, 'सध्या बॉलिवूडमध्ये खूपच बद्दल झाला आहे. नवीन फिल्म दिग्दर्शक आणि निर्माते यात उतरत आहेत. आजकाल दिग्दर्शक सर्वांशी चांगल्या पद्धतीने ट्रिस्ट करत असतात. परंतु, एक काळ असा होता की, कामाच्या बदल्यात शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केली जात होती.'

याच गोष्टीचा खुलासा करताना तिने म्हटले की, 'यापूर्वी मी एका निर्मात्याला ऑडिशन देण्यासाठी भेटले होते. यावेळी मला कामाची गरज होती. काहींनी मला समजून घेतलं तर काहींनी कामाशिवाय उगाचाच माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मला समजले की, त्यांनी कामाव्यक्तीरिक्त शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असे वागत आहेत. यानंतर मला कामाशिवाय हे लोक कशी काय ओळख वाढवितात?' असाही प्रश्न पडला असल्याचे सांगितले आहे.

यापुढे तिने 'अशा गोष्टी अत्यंत असुरक्षित व्यक्तीच करू शकतो. यात काही निर्माते आणि दिग्दर्शक फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि नावाजलेले चेहरे होते. यावरून या लोकांमध्ये प्रामाणिकपणे महिलांची मने जिंकण्याचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून येते. पण कास्टिंग काऊच फक्त बॉलिवूडपुरते मर्यादित नसून सर्वत्र पाहायला मिळतेय. इंडस्ट्रीतील काही चांगल्या लोकांमुळे मला नेहमीच सुरक्षित वाटले. याबाबत फक्त बॉलिवूडला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.'

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news