पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत ( Kangana Ranaut ) ब्लॉकबस्टर चित्रपट 'क्वीन' च्या दुसन्या भागाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल, असे संकेत आहेत. या सिक्वेलची स्क्रीप्ट पूर्ण तयार झाली आहे. कंगनाने याची सर्व माहिती घेतली आहे आणि आता यावर पुढील कामकाज सुरूही केले गेले असल्याचे संकेत आहेत.
संबंधित बातम्या
१० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'क्वीन' चित्रपटाने बराच धमाका केला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल देखील तितकाच यशस्वी होईल, असा विश्वास दिग्दर्शक विकास बहल यांनी व्यक्त केला आहे.
कंगना राणावतचे ( Kangana Ranaut ) चित्रपट प्रदीर्घ कालावधीपासून बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटत आहेत. या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द कंगनासाठी देखील हा चित्रपट यशस्वी होणे तितकेच महत्त्वाचे असेल, असे चित्र आहे. कंगनाचा 'तेजस' हा चित्रपट यापूर्वी फ्लॉप ठरला होता. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याची चाहत्यांना बरीच उत्सुकता असल्याचे आतापर्यंत सातत्याने दिसून आले आहे.