Jacqueline Fernandez : आता सुकेश चंद्रशेखरने पत्रे पाठवायचे थांबवावे; जॅकलिनची कोर्टात धाव

सुकेश चंद्रशेखर - जॅकलिन फर्नांडिस
सुकेश चंद्रशेखर - जॅकलिन फर्नांडिस

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाठग सुकेश चंद्रशेखरने आता मला पत्रे पाठवायचे तत्का‍ळ थांबवावे, (Jacqueline Fernandez) यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली कोर्टात धाव घेतली आहे. कोणतेही पत्रे, संदेश, स्टेटमेंट थेट तिच्या पत्त्यावर येतात. त्यामुळे हा प्रकार तत्काळ थांबवावा, असे जॅकलिनने म्हटले आहे. (Jacqueline Fernandez)

संबंधित बातम्या –

तिने याचिकेत म्हटले आहे, "अशा पत्रांच्या माध्यमातून तिच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, असे काही अयोग्य विधाने आरोपीकडून देण्यात आले आहेत." या माध्यमातून चंद्रशेखरकडून तिला भीती आणि धमकी देण्याचा प्रयत्न होत आहे. जॅकलिनने कोणत्याही प्रकारची साक्ष देत कोर्टात सत्याचा खुलासा करू नये म्हणून ही पत्रे पाठवली जात आहेत.

कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी १७ जानेवारीची तारीख दिलीय.

मीडिया आउटलेट्सनुसार, या पत्रामुळे चिंताजनक आणि काळजीत टाकणारे वातावरण तिच्याभोवती तयार होते. तिने कोर्टाकडे विनंती केलीय की, तपास एजन्सी, जेल अधीक्षक, मंडोली यांना तत्काळ आदेश देण्यात यावेत की, चंद्रशेखरची कोणतीही पत्रे, संदेश जारी करू नयेत.

जॅकलिन ही चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या मनी-लॉन्ड्रिंग आणि खंडणी प्रकरणाच्या संबंधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत असलेल्या एफआयआरमध्ये एक संरक्षित साक्षीदार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news