Ankita Lokhande Birthday : अंकिता पुन्हा एकदा सिद्ध करणार अभिनयाचं कौशल्य; ‘सावरकर’ मध्ये झळकणार

Ankita Lokhande Birthday
Ankita Lokhande Birthday

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे यंदाचा वाढदिवस ( Ankita Lokhande Birthday ) बिग बॉस १७च्या घरात साजरा करणार असून तिच्या या अनोख्या प्रवासाची गोष्ट कायम अतुलनीय राहिली आहे. 'अर्चना' या भूमिकेने तिने टीव्ही मालिकेत पदार्पण केलं. अंकिता पती विकी जैनसोबत बिग बॉस १७ च्या घरात प्रेक्षकांची आणि घरातील सदस्यांची मने जिंकत आहे.

संबंधित बातम्या 

"पवित्र रिश्ता" या शोमध्ये 'अर्चना देशमुख'च्या भूमिकेत पदार्पण केल्यावर अंकिताच्या कारकिर्दीतची सुरुवात झाली. यानंतर तिला सर्वत्र ओळख मिळाली आणि तिने बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे पदार्पण केले. "मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी" मध्ये शूर योद्धा झलकारीबाईची भूमिका आणि "बागी ३" सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

OTT पदार्पणात अंकिताने 'पवित्र रिश्ता: इट्स नेव्हर टू लेट' मधील तिची भूमिका 'अर्चना' पुन्हा साकारली आणि 'द लास्ट कॉफी' या डिजिटल चित्रपटात इराम कुरेशीच्या भूमिकेत आकर्षक अभिनय केला. अंकिता लोखंडे ही कायम प्रेक्षकांना मोहित करून जाणारी अभिनेत्री आहे. कायम आव्हानात्मक भूमिका स्विकारून अभिनेत्री म्हणून तिची बाजू पक्की करत आहे. रणदीप हुडासोबत "स्वातंत्र्य वीर सावरकर" मध्ये आगामी काळात ती झळकणार आहे. ( Ankita Lokhande Birthday )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news