Mahadev betting app case : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिस मुख्यालयात दाखल

Bollywood actor Sahil Khan
Bollywood actor Sahil Khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिस आज बॉलीवूड अभिनेता साहिल खानचा जबाब नोंदवणार आहेत. (Mahadev betting app case) माटुंगा पोलिसात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. नंतर तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचकडे ट्रान्सफर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने एक्स अकाऊंटवर दिली आहे. (Mahadev betting app case)

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात तमाम कलाकारांची नावे समोर आली होती. यामध्ये अभिनेता साहिल खानचे नावदेखील समोर आले. 'स्टाईल' फेम अभिनेता साहिल आरोपी नंबर २६ आहे. रिपोर्ट्सनुसार, साहिल खानवर तथाकथित महादेव ऑनलाईन सट्टेबाजी ॲपशी संबंधित आणि सट्टेबाजी ॲप चालवण्याचा आरोप आहे. अभिनेता साहिलविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 'साहिलवर ॲपचा प्रचार करण्याचा आणि ॲप चालवून नफा कमावल्याचा आरोप आहे'.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news