Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पत्नीकडून गंभीर आरोप

Nawazuddin Siddiqui with aaliya
Nawazuddin Siddiqui with aaliya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील भांडण दिवसेंदिवस अधिकच कडवट होत चालले आहे. आलिया नवाजवर आरोपांच्या फैरी झाडत आहे. कोर्टासोबतच सोशल मीडियावरही ती या घरगुती कलहावर सतत आपले मत मांडताना दिसत आहे. आता आलियाने नवाजवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली.

आलियाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने लिहिलंय की मी नवाजुद्दीन सिद्दीकी विरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार (पुराव्यासह) दाखल केली. काहीही झाले तरी मी माझ्या निष्पाप मुलांना या निर्दयी माणसाच्या हातात पडू देणार नाही. तसेच आलियाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. नवाजने मुलांचा ताबा मिळवण्यासाठी पैसा, प्रसिद्धी आणि सत्तेचा गैरवापर केला आहे, असा आरोपही आलियाने केला आहे.

नवाजुद्दीन आणि आलिया यांना दोन मुले आहेत. व्हिडिओमध्ये आलियाने पुन्हा एकदा नवाजुद्दीनवर बेजबाबदार वडील असल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते की, नवाज आपल्या दुस-या मुलासोबत कधीच राहिला नाही. तर मुलगी मोठी झाल्यानंतर नवाजने तिच्या गाठीभेटी घेऊन संपर्क सुरू केला. नवाजने मुलांच्या कस्टडीसाठी अर्ज केला आहे. या निर्दयी व्यक्तीला मुले पोटात असताना किंवा जन्म झाल्यावर सुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभुती वाटली नाही. त्याला डायपरची किंमत किती आहे? ते कसे घालायचे असतात? हे सुद्धा माहीत नाही. 12 वर्षांपर्यंत मुलं कशी वाढली हे कोणालाच माहीत नाही. आता तो मुलांना माझ्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो भित्रा बाप आहे, अशी टीकाही आलियाने केली आहे.

आलिया पुढे म्हणते, मी नवाजला नेहमीच माझा पती मानत आले आहे, पण त्याने मला कधीच पत्नी मानले नाही. हा माणूस धनशक्तीच्या जोरावर निच कृत्य करत आहे. पण त्याला माहित नाही की त्याच्यापेक्षा शक्तिशाली कोणीतरी आहे. त्याने कधीही आपल्या मुलाला मिठी मारली नाही. तू पैशाने किती जणांना खरेदी करणार? तू माझ्यापासून माझी मुले हिसकावून घेऊ शकणार नाहीस, असा थेट इशाराही तिने नवाजुद्दीन सिद्दीकीला दिला आहे.

घरगुती कलहाचे हे प्रकरण काय आहे?

2021 मध्ये आलियाने नवाजला घटस्फोट घेण्याबाबत सांगीतले होते. त्यानंतर पहिल्यांदाच या वादाची बातमी आली होती. त्यानंतर ती दुबईला गेली. आलिया गेल्या महिन्यात भारतात परतली आणि अभिनेत्याच्या घरी राहू लागली. त्यामुळे संतप्त अभिनेत्याच्या आईने आलियाविरुद्ध घरात घुसखोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर आलियानेही नवाजच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांचा घटस्फोट झाल्याचे नवाजच्या वकिलांचे म्हणणे आहे.

आलिया ही नवाजची दुसरी पत्नी आहे. नवाजने 2009 मध्ये आलियाशी लग्न केले होते. पण मागील काही वर्षांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी एकमेकांमधील मतभेद दूर करून ही जोडी पुन्हा एकत्र आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण सध्याची परिस्थिती पाहता दोघांमधील वाद विकोपाला गेला आहे हे सिद्ध होते. आलियाचे खरे नाव अंजली किशोर पांडे होते. लग्नासाठी आलियाने इस्लाम धर्म स्वीकारून नाव बदलले होते.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीला कोर्टातून दिलासा मिळाला आहे. त्याच्यावरील हुंडाबळीचा खटला न्यायालयाने फेटाळून लावला. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या आईविरुद्ध मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 498 ए आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची याचिका केली होती. नवाजुद्दीन आणि त्याचे कुटुंब हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप आलियाने केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news