पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अक्षय कुमार शनिवारी महाकाल दरबारात पोहोचला. आज ९ सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला अत्रय कुमार आपल्या कुटुंबासोबत बाबा महाकालच्या दर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पोहोचला. यादरम्यान त्याच्यासोबत क्रिकेटर शिखर धवनदेखील महाकाल दरबारात दिसला.
जगप्रसिद्ध श्री महाकाल मंदिराचे पुजारी पंडित आशिष गुरू यांनी सांगितले की, चित्रपट अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह बाबा महाकालच्या वाढदिवसानिमित्त भस्म आरतीला आला होता. त्याने बाबा महाकालच्या या दिव्य भस्म आरतीचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत मुलगा आरव, भाची सिमर आणि बहीण अलका हिरानंदानीही उपस्थित होते.
आज सकाळी भस्म आरतीच्या वेळी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार बाबा महाकालच्या भक्तीमध्ये इतका तल्लीन झाला की भोले शंभू भोलेनाथांचे गुणगान गाऊ लागले आणि नाचू लागला, टाळ्या वाजवत तो भक्तीरसात तल्लीन झाला. यादरम्यान एक खास गोष्ट म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि आरवने पारंपरिक पोशाखात उपरणे परिधान केलेले दिसले.
अभिनेता अक्षय कुमारने यापूर्वीही अनेकवेळा बाबा महाकालच्या दरबारात जाऊन दर्शन घेतले होते, मात्र आज वाढदिवसानिमित्त तो बाबा महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला. बाबा महाकाल मंदिरात त्याने त्याच्या आगामी मिशन राणीगंज चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनादेखील केली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवनही त्याच्यासोबत होता.