Drishyam २ collection : ‘दृश्यम २’ ने आठ चित्रपटांना टाकलं मागे; यावर्षातील सर्वात मोठा दुसरा ओपनर

Drishyam २ collection
Drishyam २ collection
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू आणि अक्षय खन्ना यांचा 'दृश्यम २' (Drishyam २)  चित्रपटाने पहिल्‍याच दिवशी अपेक्षेपेक्षा भरघोस कमाई केली.  यावर्षीचा सुरुवातीलाच सर्वाधिक कमाई करणारा हा वर्षातील दुसरा चित्रपट ठरला आहे. ( Drishyam २ collection )

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम २' हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पडद्यावर रिलीज झाला. रिपोर्टनुसार,  या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास १५.३८ कोटी रुपयांची कमाई केली. त्‍यामुळे हा चित्रपट अभिनेता रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या कमाईच्या आकड्याजवळ पोहोचण्यास यशस्वी झाला आहे.

दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ३६ कोटींचा कोटींची कमाई केली होती. यामुळे 'ब्रह्मास्त्र' हा २०२२ चा सर्वात मोठा ओपनर ठरला होता. आता अजयचा 'दृश्यम २' ने १५, ३८ कोटींची ( Drishyam २ collection ) कमाई केल्याने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलं नाही. या वर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणकून आदळले आहेत. परंतु, असे असतानाही काही असे चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफीसवर पहिल्याच दिवशी १० कोटींचा टप्पा पार केला आहे. यामध्‍ये 'दृश्यम २' सोबत राम सेतु (15.25 कोटी), भूल भुलैया २ (14.11 कोटी), बच्चन पांडे (13.25 कोटी), लाल सिंह चड्ढा (11.70 कोटी), सम्राट पृथ्वीराज (10.70 कोटी), विक्रम वेधा (10.58 कोटी), गंगूबाई काठियावाड़ी (10.50 कोटी) आणि शमशेरा (10.25 कोटी) हे आहेत. या सर्वाच्या आकडेवारीवरून 'दृश्यम २' ची आकडेवारी जास्त आहे. या चित्रपटाने या वर्षातील आठ चित्रपटांना मागे टाकत पहिल्‍याच दिवशी भरघोस कमाई केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news