Bollywod Sex Life : ‘हा’ अभिनेता पर्समध्ये नेहमी ठेवतो कंडोम! सेक्सबाबत बॉलिवूड स्टार्सचे धक्कादायक खुलासे

Bollywod Sex Life : ‘हा’ अभिनेता पर्समध्ये नेहमी ठेवतो कंडोम! सेक्सबाबत बॉलिवूड स्टार्सचे धक्कादायक खुलासे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कुठेही वाच्यता करायला आवडत नसते पण, सध्याचे यंग बॉलिवूड स्टार्स स्वताच्या आयुष्यामध्ये घडलेले किस्से थेट जाहीर करत असतात. दरम्यान आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही अभिनेत्यांनी खुलासे केले आहेत. काहींनी थेट सेक्स बाबतही वक्तव्य केली आहेत. (Bollywod Sex Life)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिने आपल्या आवडलेल्या सेक्स पोझिशन बद्दल खुलासा केला आहे. मिड-डे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'द क्लासिक मिशनरी' ही तिची आवडती सेक्स पोझिशन असल्याचे सांगितले आहे. आपण सेक्स आनंदासाठी करतो असेही ती म्हणाली.

Bollywod Sex Life : १२ वर्षांचा असताना रणवीरने व्हर्जिनीटी गमावली

बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार चर्चेत असलेला रणवीर सिंग खूप बोलका अभिनेता आहे. कोणत्याही मुद्द्यावर तो मनमोकळेपणाने बोलतो. एका मुलाखतीत रणवीरने सांगितले की, १२ वर्षांचा असताना त्याने आपली व्हर्जिनीटी गमावली होती. शाळेत बहुतेक मुलांच्या आईंची तक्रार होती. हा मुलगा आमच्या मुलांना बिघडवेल. याचबरोबर इंडिया टुडेच्या मुलाखतीत रणवीर म्हणाला होता आपण नेहमी खिशात कंडोम ठेवतो.

रणबीर कपूरने ही पुर्वी भांग आणि सिगारेट पिऊन धुमाकूळ घातल्याचे एका मुलाखतीत माहिती दिली. रणवीरच्या म्हणण्यानुसार, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी व्हर्जिनीटी गमावली.

सलमान खानने दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केलेल्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये मी अजूनही व्हर्जिन असल्याचा खुलासा सलमानने केला होता. मी जीच्याशी लग्न करेन तिच्यासोबतच सेक्स करेन असे ही तो म्हणाला होता.

प्रेमापेक्षा सेक्सला महत्व

अर्जून कपूर आणि मलाईका अरोरा सध्या एकमेकाला डेट करतात. त्याने नुकत्याच एका फिल्मफेअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत बहुतेक पुरुषांमध्ये प्रेमापेक्षा सेक्स महत्वाचा असतो. यामुळे सेक्सला जास्त महत्व दिले पाहिजे असे तो म्हणाला.

एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने सेक्स लाईफबद्दल सांगितले. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सेक्स महत्त्वाचा आहे. मला अक्षयमध्ये ज्या गोष्टी आवडतात त्या गेल्या काही वर्षांत कोणाच्यात दिसल्या नाहीत. काळ खुप बदलला आहे

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध स्टार बनलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल सांगितले होते. मला 60 च्या दशकातील गोष्टी आवडतात त्यामुळे मला 69 पोझिशन खुप आवडत असल्याते तो म्हणाला होता.

इमरान हाश्मीला इंडस्ट्रीचा सीरियल किसर म्हटले जाते. एक विवाहित पुरुष म्हणून मी वन नाईट स्टँडला खूप मिस करत असल्याचे इमरान म्हणाला होता.

जे पुरूषांना आवडते ते स्त्रियांनाही आवडते

अभिनेत्री विद्या बालन हिने महिलांच्या सेक्सबाबत म्हणाली की, आम्हाला जेवढा सेक्स करायला आवडतो, आम्हाला सेक्स पाहिजे असतो तितकाच पुरूषांनाही पाहिजे असतो.

कश्मिरा शाहने एकदा तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दलची माहिती उघड केली. माझी आवडती सेक्स पोजीशन 'डॉगी स्टाईल' असल्याचे ती म्हणाली होती.

इंडिया टाइम्सच्या मुलाखतीत कल्की कोचलिनने तिच्या बालपणातील लैंगिक शोषणाशी संबंधित एक धक्कादायक किस्सा उघड केला. ती म्हणाली वयाच्या ९व्या वर्षी मी कोणाला तरी माझ्यासोबत सेक्स करण्याची परवानगी द्यायची. मला त्याचा अर्थ माहित नव्हता तरीही मला ते आवडायचे असे ती म्हणाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news