केरळमध्ये स्फोट, कर्नाटकात खबरदारी

केरळमध्ये स्फोट, कर्नाटकात खबरदारी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : केरळ येथील एर्नाकुलम येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांतील संवेदनशील भागात खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. केरळच्या सीमेबरोबर राज्याच्या सर्वच सीमाभागात खबरदारी घेण्याची सूचना गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी पोलिसांना दिली आहे.

मंगळूरच्या सीमाभागात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मडीकेरी, म्हैसूर, मंगळूर आदी भागांत दसर्‍याच्यादरम्यान शांतता भंग करणारी कोणतीही घटना घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. केरळमध्ये बॉम्बस्फोट घडल्याने बंदोबस्त कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. बीटकॉईन घोटाळ्यांनतर राज्यातील पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुणवतेचे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news