Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ६ महिला जागीच ठार

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ६ महिला जागीच ठार
Published on
Updated on

ऊना; पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशातील ऊना येथे फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अनेकजण जिवंत जळाले आहेत. अग्निशमन दल आणि पोलिस पथकाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Himachal Pradesh)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका मोठा होता की शेजारील फॅक्टरींमधील काचा तुटल्या होत्या. या स्फोटात ६ महिलांचा समावेश आहे. या सर्व फटाका कंपनीत काम करत होत्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान उपचार सुरू असलेल्या दोन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील ऊना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची बातमी ऐकून मन सुन्न झाले. सर्व मृतांच्या आत्मास शांती मिळावी, शोकाकूल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Himachal Pradesh : मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

ऊना उपायुक्त राघव शर्मा म्हणाले की, ही घटना ऊना जिल्ह्यातील बाथू औद्योगिक परिसरात घडली. मृत आणि जखमी झालेले बहुतेक लोक प्रवासी मजूर आहेत. पोलीस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी आहेत. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news