Tata Steel Plant Blast : टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन कामगार जखमी

Tata Steel Plant Blast : टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन कामगार जखमी
Published on
Updated on

जमशेदपूर (झारखंड) : पुढारी ऑनलाईन

झारखंडच्या (Jharkhand) जमशेदपूर (Jamshedpur) येथील टाटा स्टील प्लांटमध्ये (Tata Steel Plant) मोठा स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत 3 मजूर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Tata Steel Plant Blast)

मुख्यमंत्री सोरेन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटलंय की, जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला. टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जिल्हा प्रशासन जखमींवर जलद उपचारासाठी कार्यवाही करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. (Tata Steel Plant Blast)

अपघातात जखमी झालेल्या मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांचे 11 सदस्यीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, स्टील प्लांटच्या ज्या भागात आग लागली तो भाग सध्या कार्यरत नव्हता. सकाळी 10.20 च्या सुमारास आग लागली आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Tata Steel Plant Blast)

आग आटोक्यात…

टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोक प्लांटच्या बॅटरीमध्ये स्फोट झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कंत्राटावर काम करणारे 2 कर्मचारी जखमी झाले. याशिवाय एका कर्मचाऱ्याला छातीत दुखत असल्याची तक्रार असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. स्फोट कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. (Tata Steel Plant Blast)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news