Black Rice : काळा तांदूळही असतो आरोग्यासाठी गुणकारी

Black Rice
Black Rice
Published on
Updated on

नवी दिल्ली : तांदळाचेही (Black Rice) अनेक प्रकार असतात. सर्वसाधारणपणे सर्वांकडे पांढरा तांदूळ खाल्ला जातो. हल्ली पौष्टिक असल्याने 'ब्राऊन राईस' ही लोकप्रिय झालेला आहे; मात्र तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदूळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. महत्त्वाचे म्हणजे, पांढर्‍या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ आरोग्यासाठी अनेक पटीने जास्त फायदेशीर आहे. काळ्या तांदळात भरपूर प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट असतात त्यामुळे आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे होतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काळा तांदूळ (Black Rice) पांढर्‍या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. काळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. याशिवाय काळा तांदूळ अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठीही लाभदायक ठरतो. याशिवाय, त्याच्यामध्ये अँन्थोसायनिन देखील आहे, जे हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एवढेच नव्हे तर ते आपल्याला हार्ट अ‍ॅटॅकपासून देखील वाचवण्यास मदत करते. काळ्या तांदळातील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अथ्राेस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

काळ्या तांदळाच्या (Black Rice) सेवनाने अशक्तपणा आणि थकवा येण्याची समस्या दूर होते. यासोबतच अल्झायमरची समस्याही याच्या सेवनाने हळूहळू कमी होऊ लागते. काळ्या तांदळाच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स होते. वास्तविक हा तांदूळ अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news