सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी भाजपने सोडले चंदीगड महापौरपद!

महापौरपदी निवड झाल्यानंतर मनोज सोनकर यांचे स्‍वागत करताना भाजपचे नगरसेवक. (फाईल फोटो- पीटीआय)
महापौरपदी निवड झाल्यानंतर मनोज सोनकर यांचे स्‍वागत करताना भाजपचे नगरसेवक. (फाईल फोटो- पीटीआय)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महापौरपदाच्या निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत 'आप'ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज ( दि. १९) सुनावणी होणार आहे. यापूर्वी चंदीगडचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला.  ( BJP's Manoj Sonkar quits as Chandigarh Mayor )

चंदीगड महापौरपदाबाबत भाजपच्‍या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर पक्षाने सोनकर यांना महापौरपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. ३० जानेवारी रोजी चंदीगड महापौर निवडणुकीदरम्यान भाजपने पोस्टल बॅलेटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला होता. या निवडणुकीत भाजपचे मनोज सोनकर यांनी महापौरपदासाठी आपच्या कुलदीप कुमार यांचा पराभव केला. या निवडणुकीत आठ मते अवैध ठरविण्‍यात आली होती.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे

पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांना मतपत्रिकेशी छेडछाड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला  हाेता. सर्वोच्च न्यायालयाने पीठासीन अधिकाऱ्याला फटकारले आणि ही लोकशाहीची थट्टा असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिका आणि निवडणूक प्रक्रियेचा व्हिडिओ जतन करावेत. तसेच पीठासीन अधिकाऱ्याला १९ फेब्रुवारीला व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे वर्तन स्पष्ट करण्यासाठी न्‍यायालयात हजर राहावे, असे निर्देशही सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news