सांगली: महापालिका स्थायी सभापती निवडणुकीत भाजपचे धीरज सूर्यवंशी विजयी; काँग्रेसचे संतोष पाटील पराभूत

सांगली: महापालिका स्थायी सभापती निवडणुकीत भाजपचे धीरज सूर्यवंशी विजयी; काँग्रेसचे संतोष पाटील पराभूत
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपचे धीरज सूर्यवंशी विजयी झाले असून, काँग्रेसचे उमेदवार संतोष पाटील यांचा पराभव झाला. या निवडणूकीत सूर्यवंशी यांना 9 मते तर पाटील यांना 5 मते मिळाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे 2 सदस्य अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे. दीड वर्षापूर्वीच्या महापौर निवडणुकीतील पराभवाचा वचपा भाजपने  काढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

स्थायी समितीत भाजपचे 9, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. स्थायी समितीत भाजपचे बहूमत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली होती. मात्र उमेदवारी मिळवण्यात आणि निवडणुकीतही माजी उपमहापौर व भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी बाजी मारली. सूर्यवंशी यांना 9 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार पाटील यांना 5 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या पवित्रा केरीपाळे, संगीता हारगे या सदस्या गैरहजर राहिल्या. विजयानंतर भाजपचे कार्यकर्ते, सूर्यवंशी समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news