चिंचवड पोटनिवडणुक: भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

चिंचवड पोटनिवडणुक: भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. जगताप यांनी 36 हजार 168 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते पडली. नाना काटे यांना 99 हजार 343 मते पडली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 82 मते पडली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती. जगताप या दुपारी 4:15 च्या सुमारास थेरगाव येथील मतमोजणी केंद्राजवळ पोहोचल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. हलगीचा खणखणाट आणि फटाक्यांच्या आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मतमोजणीचा अंतिम निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची उत्कंठा ताणली गेली होती. मतमोजणी केंद्राबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांची झालेली गर्दी पाहता त्यांना या बॅरिकेट्स बाहेरच पोलिसांनी थांबवून ठेवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news